वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियामध्ये परतण्याची इच्छा – युसूफ

चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा विश्वास दर्शवत युसूफ पठाणनं सांगितलं की, वर्ल्डकप 2015च्या आधी आपलं महत्त्व सिद्ध करून टीम इंडियामध्ये परतायची इच्छा आहे. 

Updated: Sep 11, 2014, 04:11 PM IST
वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियामध्ये परतण्याची इच्छा – युसूफ title=

मुंबई: चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा विश्वास दर्शवत युसूफ पठाणनं सांगितलं की, वर्ल्डकप 2015च्या आधी आपलं महत्त्व सिद्ध करून टीम इंडियामध्ये परतायची इच्छा आहे. 

पठाणनं सांगितलं, “आयपीएलची मागील सीरिज खूप चांगली होती आणि पुढील सत्रात चांगलं प्रदर्शन करून निवडणकर्त्यांचं लक्ष आपल्याकडे खेचण्याची सुवर्ण संधी मला आहे. वर्ल्ड कप 2015ला अजून खूप वेळ आहे आणि मी निश्चितच टीम इंडियात खेळू इच्छितो.”

कोलकाता नाइट रायडर्सचे बॅट्समन असलेला युसूफ म्हणतो, “खेळाची सुरूवात चॅम्पियन्स लीगमधून होईल, त्यानंतर वन डे आणि दलीप ट्राफी मॅच आहे. मी आपला खेळ अधिक चांगला बनविण्यासाठी जे काही करतोय, ते योग्य दिशेनं सुरू आहे.” आयपीएलमधील फॉर्म कायम ठेवण्यासाठी उत्सुक असलेला पठाण म्हणाला की, चॅम्पियन्स लीग मोठी टुर्नामेंट आहे आणि आयपीएलमधील प्रदर्शनात तोच फॉर्म कायम ठेवायची इच्छा आहे. 

त्यानं सांगितलं, आपली खेळी दाखविण्यासाठी क्रिकेटमधील हा फॉर्म उत्तम आहे. मी आयपीएलमधील फॉर्मला कायम ठेवू इच्छितो, असं युसूफ म्हणाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.