भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय टीम टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त होती. 

Updated: Jul 21, 2016, 04:20 PM IST
भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक title=

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय संघ टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त होती. आता मात्र बरेच महिन्यांनी भारतीय संघ पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेट खेळणार आहे. आजपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होते आहे. या दौऱ्यामध्ये एकुण चार टेस्ट मॅच होणार आहेत. 

असा असेल भारताचा वेस्ट इंडिज दौरा

21 जुलै ते 25 जुलै- पहिली टेस्ट- अँटिग्वा

30 जुलै ते 3 ऑगस्ट- दुसरी टेस्ट- जमैका

9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट- तिसरी टेस्ट- सेंट लुशिया

18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट- चौथी टेस्ट- त्रिनिदाद