सेरेना विल्यम्स विम्बल्डन टेनिसची विजेती

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाचा पराभव करत विजेतेपद पटाकवले. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहावं आणि एकूण २१वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद सेरेना विल्यम्सच्या नावावर झाले आहे.

AFP | Updated: Jul 11, 2015, 10:18 PM IST
सेरेना विल्यम्स विम्बल्डन टेनिसची विजेती title=

लंडन :  अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाचा पराभव करत विजेतेपद पटाकवले. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहावं आणि एकूण २१वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद सेरेना विल्यम्सच्या नावावर झाले आहे.

विम्बल्डच्या अंतिम सामन्यात सेरेनाने गार्बिनचा ६-४, ६-४ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत सेरेनाने रशियाच्या मारिया शारापोव्हा हिचा पराभव करत विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने पोलंडच्या अग्निरजस्का रादवांस्काला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

१९ वर्षांत प्रथमच स्पेनच्या महिला खेळाडू गारबीन मुगुरुझाने विम्बल्डनची अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गार्बिनच्या अगोदर अरांता सांचेझने १९९६मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या कोंचिता मार्टिनेझ हीने १९९४ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.