उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं आणखी एक गोल्ड

वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनचं आव्हानं संपवत २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. यावर्षीच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये बोल्टचं हे दुसरं गोल्ड आहे.

PTI | Updated: Aug 27, 2015, 11:04 PM IST
उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं आणखी एक गोल्ड  title=

अमेरिका: वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनचं आव्हानं संपवत २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. यावर्षीच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये बोल्टचं हे दुसरं गोल्ड आहे.

आणखी वाचा - उसेन बोल्ट पुन्हा ठरला वेगाचा बादशाह

जस्टिन गॅटलिनचा पराभव

यापूर्वी १०० मीटर स्पर्धेत गॅटलिनला मागे टाकत बोल्टनं २०० मीटरम अंतर १९.५५ सेकंदामध्ये पार केलं होतं. यावरून तो वेगाचा बादशहा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बर्ड्स नेस्ट स्टेडियममध्ये सर्वांच्या नजरा बोल्ट आणि गॅटलिनवर होत्या. गॅटलिननं सेमीफायनलमध्ये बोल्टला मागे टाकलं होतं. मात्र १०० मीटर सारखंच जमेकाच्या अॅथलिटनं आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन फायनलमध्ये केलं.

आणखी वाचा - महाराष्ट्राच्या हिरकणीचा जिगरबाज परफॉर्मन्स!

अनासो जोबोदवाना तिसऱ्या नंबरवर

गॅटलिन बोल्टच्या जवळही फिरकू शकला नाही. त्यानं १९.७४ सेकंदांसह सिल्वर मेडलवर संतोष मानावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या अनासो जोबोदवानानं १९.८७ सेकंदांमध्ये हे अंतर कापत ब्रॉन्ज मेडल मिळवलं. 

दरम्यान, उसेन बोल्ट जिंकल्यानंतर सर्वांना अभिवादन करत असतांना, त्याच्या मागून एक कॅमेरा जात होता. कॅमेरामन अचानक पडला आणि त्यानं बोल्टलाही पाडलं. हे दृश्य पाहून हशा पिकला... आता हा व्हिडिओ यूट्यूबर चांगलाच वायरल होतोय. 

पाहा उसेन बोल्ट कसा पडला - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.