व्हिडिओ : अजिंक्यचा 'मॅजिक कॅच' व्हायरल

धर्मशाला टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवत सीरिजही आपल्या घशात घातलीय. दरम्यान, या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं घेतलेला एक कॅच सोशल मीडियावर 'मॅजिक कॅच' म्हणून व्हायरल झालाय.

Updated: Mar 28, 2017, 12:52 PM IST
व्हिडिओ : अजिंक्यचा 'मॅजिक कॅच' व्हायरल title=

धर्मशाला : धर्मशाला टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवत सीरिजही आपल्या घशात घातलीय. दरम्यान, या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं घेतलेला एक कॅच सोशल मीडियावर 'मॅजिक कॅच' म्हणून व्हायरल झालाय.

या मॅचमधल्या अजिंक्याच्या स्लिप फिल्डिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. अजिंक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अश्विनच्या बॉलवर पीटरचा एक जबरदस्त कॅच मिळवला... हा कॅच प्रेक्षकांसाठी जितका आश्चर्यकारक होता... तितकाच तो अश्विनसाठीही आश्चर्यकारक होता. 

यापूर्वी, रहाणेनं ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अश्विनच्याच एका बॉलवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथचीही स्लिपमध्ये शानदार कॅच घेतली होती.