विजेंदर सिंग ठरला डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन

विजेंदर सिंगनं ऑस्ट्रेलियाच्या केरी होपला नॉक आऊट पंच देत प्रो-बॉक्सिंगमधील आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. 

Updated: Jul 17, 2016, 08:08 AM IST
विजेंदर सिंग ठरला डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन title=

नवी दिल्ली : विजेंदर सिंगनं ऑस्ट्रेलियाच्या केरी होपला नॉक आऊट पंच देत प्रो-बॉक्सिंगमधील आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. 

विजेंदरनं सलग सातवा विजय मिळवत डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफीक चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं. 

या विजयासह विजेंदरचं रँकिंगही कमालीचं सुधारलं. तो रँकिंगमध्ये 15 व्या क्रमांकावर पोहचलाय.