विराट-एबी पुढच्या मॅचमध्ये कमबॅक करणार!

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात झाली असली तरी प्रत्येक टीमच्या खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. 

Updated: Apr 9, 2017, 04:22 PM IST
विराट-एबी पुढच्या मॅचमध्ये कमबॅक करणार! title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात झाली असली तरी प्रत्येक टीमच्या खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. या दुखापतींचा सगळ्यात जास्त फटका रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बसला आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि लोकेश राहुल दुखापतग्रस्त आहेत. पण आता कोहली आणि एबी पुढच्या मॅचमध्ये दिसू शकतात असे संकेत आरसीबीचा कॅप्टन शेन वॉटसननं दिले आहेत.

आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या मॅचमध्ये आरसीबीचा विजय झाला होता. आता कोहली आणि एबीनं कमबॅक केल्यामुळे आरसीबीचा आत्मविश्वास वाढायला नक्कीच मदत होईल.

पाहा काय म्हणाला वॉटसन