व्हिडिओ - विराट कोहली स्टिव्ह स्मिथवर संतापला

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. 

Updated: Jan 27, 2016, 04:39 PM IST
 व्हिडिओ - विराट कोहली स्टिव्ह स्मिथवर संतापला  title=

अॅडिलेड :  भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. 

सुरूवातीला तडाखेबाज फलंदाजी करत त्याने ५५ चेंडूत ९० धावा काढल्या. त्यात त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावले. 

स्मिथवर चिडला विराट

रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथ याने विराट कोहलीकडे कॅच दिल्यानंतर विराट कोहली संतापला आणि स्मिथला आर्वाच्य भाषेत त्याने बोलला. तो खूप संतापला होता. त्याने स्मिथ बाद झाल्याचा आनंद व्यक्त केला नाही.  तो बडबडत होता. त्याने एक दोन शिव्याही घातल्याचे टीव्हीमध्ये दिसत होते. तसेच त्याने नंतर धोनी जवळ येऊ आपण का चिडलो याचे स्पष्टीकरण दिले. 

पाहा तो नेमका व्हिडिओ...