आता गोवा फुटबॉल टीम विराट कोहलीच्या मालकीची!

सचिन तेंडुलकरनंतर आता स्टार क्रिकेटर विराट कोहली हा देशातील बहुचर्चित फुटबॉल लीग टूर्नामेंट इंडियन सुपर लीग (आयएसएल)शी जोडला गेला आहे. कोहली हा आयएसएलच्या गोवा फ्रेन्चायझीचा सहाय्यक मालक आणि अम्बेसेडर असणार आहे.

Updated: Sep 26, 2014, 05:39 PM IST
आता गोवा फुटबॉल टीम विराट कोहलीच्या मालकीची! title=

गोवा : सचिन तेंडुलकरनंतर आता स्टार क्रिकेटर विराट कोहली हा देशातील बहुचर्चित फुटबॉल लीग टूर्नामेंट इंडियन सुपर लीग (आयएसएल)शी जोडला गेला आहे. कोहली हा आयएसएलच्या गोवा फ्रेन्चायझीचा सहाय्यक मालक आणि अम्बेसेडर असणार आहे.

आयएसएलची पहिली टूर्नामेंट १२ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. ही टूर्नामेंट २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ‘मी आयएसएल फ्रेन्चायझीसाठी खूप उत्सुक असून यामुळं भारतात फुटबॉलच्या विकासाला चालना मिळणार आहे’, असं यावेळी कोहली म्हणाला.

गोवा एफसी हे आगामी आयएसएल टूर्नामेंट सर्वांसाठी मोठं आवाहन असणार आहे. आंतरराष्ट्रीय दिग्गज फुटबॉल खेळाडूंच्या अनुभवाचा टीमसाठी खूप मोठा फायद होईल, असंही यावेळी तो म्हणाला.

एफसी गोवानं ब्राझीलचे दिग्गज फुटबॉल खेळाडू जिकोला याला मुख्य कोच बनवलंय. एफसी गोवा १६ ऑक्टोबरला चेन्नईच्या विरुद्ध आयएसएलमध्ये त्यांच्या सामन्यांपासून त्याचं आगमन होईल, असंही विराट यावेळी बोलत होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.