सामना आम्ही जिंकू शकलो असतो मात्र... - कोहली

Last Updated: Monday, March 20, 2017 - 19:18
सामना आम्ही जिंकू शकलो असतो मात्र... - कोहली

रांची : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमन साहा यांनी ऱांची कसोटीत केलेल्या १९९ धावांच्या भागीदारीचे कौतुक केले. अशी भागीदारी यापूर्वी पाहिली नसल्याचे कोहली म्हणाला.

रांचीतील कसोटीत पुजाराने २०२ धावा ठोकल्या तर साहाने ११७ धावांची खेळी केली. त्यांच्या चांगल्या भागीदारीमुळे भारताला पहिल्या डावात ६०० पार धावसंख्या उभारता आली. 

सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात त्याने पुजारा आणि साहाच्या भागीदारीचे कौतुक केले. आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो. पुजारा आणि साहाच्या भागीदारीमुळे आम्ही १५२ धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवशी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेटही घेतल्या. मात्र शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या १२४ धावांच्या भागीदारीमुळे सामना अनिर्णीत राहिला. 

तसेच यावेळी कोहलीने जडेजाच्या कामगिरीचेही कौतुक केले. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. 

First Published: Monday, March 20, 2017 - 19:18
comments powered by Disqus