आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचं वन-डे रँकिंगमध्ये दुसरं स्थान कायम आहे. कोहलीच्या बॅटची जादू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चालते. मात्र, गेल्या काही काळ्यात त्यानं आपल्या बॅटिंगनं वन-डे 

PTI | Updated: Jul 14, 2014, 09:04 AM IST
आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर title=

दुबई: टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचं वन-डे रँकिंगमध्ये दुसरं स्थान कायम आहे. कोहलीच्या बॅटची जादू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चालते. मात्र, गेल्या काही काळ्यात त्यानं आपल्या बॅटिंगनं वन-डे 

क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रचले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याला फारस यश मिळालं नाही. मात्र, वन-डे रँकिंगमधील त्याला आपला दुसरा क्रमांक कायम राखण्यात यश आलंय. 

कोहलीसोबत दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमलाही ८६८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार अब्राहम डिव्हिलियर्स अव्वल आहे. 

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सहाव्या, तर शिखर धवन दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या रँकिंगवर पाकिस्तानचा सईद अजमल अव्वल असून, सुनील नारिन दुसऱ्या, तर जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.