कोहलीनं सचिन-पॉटिंगलाही टाकलं मागे

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कोहलीनं 26वी सेंच्युरी मारली. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

Updated: Oct 24, 2016, 04:02 PM IST
कोहलीनं सचिन-पॉटिंगलाही टाकलं मागे  title=

मोहाली : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कोहलीनं 26वी सेंच्युरी मारली. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये 49 सेंच्युरींसह सचिन पहिल्या क्रमांकावर, 30 सेंच्युरी मारणारा रिकी पॉईंटिंग दुसऱ्या आणि 28 सेंच्युरी मारणारा सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मोहालीमध्ये 26 वी सेंच्युरी मारल्यानंतर कोहलीनं सचिन, पॉईंटिंग आणि जयसूर्याला मागे टाकलं आहे. 26 सेंच्युरी मारायला विराट कोहलीला 166 इनिंग लागल्या आहेत. सचिनला 26 सेंच्युरी पूर्ण करायला 247 इनिंग लागल्या होत्या, तर पॉईंटिंगला 286 आणि जयसूर्याला 402 इनिंग खेळल्यानंतर 26 सेंच्युरी बनवता आल्या.