मालिका विजयाचे श्रेय अश्विनला : विराट

भारताचा कसोची कर्णधार विराट कोहलीने सलग दोन मालिका जिंकण्याचे पूर्ण श्रेय फिरकीपटू आर. अश्विनला दिलेय. अश्विनने शुक्रवारी आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतीली दुसऱ्या डावात सात आणि एकूण मिळून १२ विकेट घेतल्या. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे तिसऱ्या कसोटीसह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली. 

Updated: Nov 28, 2015, 08:55 AM IST
मालिका विजयाचे श्रेय अश्विनला : विराट title=

नागपूर : भारताचा कसोची कर्णधार विराट कोहलीने सलग दोन मालिका जिंकण्याचे पूर्ण श्रेय फिरकीपटू आर. अश्विनला दिलेय. अश्विनने शुक्रवारी आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतीली दुसऱ्या डावात सात आणि एकूण मिळून १२ विकेट घेतल्या. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे तिसऱ्या कसोटीसह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली. 

विराटच्या नेतृत्वाखाली याआधी भारताने श्रीलंकेला त्यांच्या मातीत २-१ अशी धूळ चारली होती. 'अश्विन जागतिक स्तरावरील अव्वल फिरकीपटू आहे. भारताच्या विजयात त्यानं मोलाची भूमिका बजावलीय. श्रीलंकेच्या विजयातही अश्विनचा मोठा वाटा होता. त्याच्यामुळे सलग दोन मालिका जिंकण्यात आम्ही यशस्वी ठरलो. भारताकडून त्याने दोन्ही मालिकेत उत्तम प्रदर्शन केले. अश्विनसारखा क्रिकेटपटू आमच्या संघात असल्याचा मला खूप आनंद आहे,' अशा शब्दात विराटनं अश्विनची स्तुती केली. 

अश्विनला रविंद्र जडेजा आणि अमित मिश्रा यांनीही चांगली साथ दिली. 'या विकेट आमच्यासाठी आव्हानात्मक होत्या. मोहालीमध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आमच्या फलंदाजांनी तीन्ही डावांत चांगली कामगिरी केली. अनेकदा परिस्थिती गोलंदाजांसाठी अनुकूल होती. मालिक जिंकणे खूपच आवश्यक होते. आता दिल्लीतही कामगिरीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करु,' असे विराट म्हणाला.

तिसऱ्या कसोटी सामन्यात ६६ धावांत सात बळी घेणाऱ्या अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विराटने मिश्राचेही कौतुक केले. तिसऱ्या दिवशी लंचनंतर अमितने सुरेख पद्धतीने स्पेल केले आणि दोन महत्त्वाचे बळी मिळवले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.