लाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांना कॅमेऱ्यासमोरून हटवलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान एका टीव्ही चॅनेलवर धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम एका चॅनेलवर लाईव्ह बातचीत करत होते. यादरम्यान काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना तेथून हटवले. यानंतर काय घडले हे चॅनेलने पुढे दाखवले नाही. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Updated: Mar 28, 2016, 09:42 AM IST
लाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांना कॅमेऱ्यासमोरून हटवलं  title=

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान एका टीव्ही चॅनेलवर धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम एका चॅनेलवर लाईव्ह बातचीत करत होते. यादरम्यान काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना तेथून हटवले. यानंतर काय घडले हे चॅनेलने पुढे दाखवले नाही. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

मुंबईतून वसीम अक्रम लाईव्ह बातचीत करत होते. यावेळी विराटच्या खेळीबाबत ते बोलत असताना काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी वसीम यांना तेथून हटण्यास सांगितले. या प्रकारानंतर वसीम यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत जाणून घेण्यासाठी चाहत्यांचे ट्विट्स सुरु होते. वसीम अक्रम यांच्यासोबत काय झाले? ते ठीक तर आहेत ना? अशा प्रकारचे ट्विट होत होते. 

दरम्यान, या व्यक्ती कोण होत्या याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या बातचीतपूर्वीच अक्रम यांनी लाहोरमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल ट्विट केले होते.