सरावात वॉटसनच्या हेल्मेटला लागला बाउंसर

 मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये सराव करताना जलद गती गोलंदाज जेम्स पॅटीसन याचा बॉउंसर ऑस्ट्रेलिया ऑलराउंडर शेन वॉटसनच्या हेल्मेटला लागला आणि फिल ह्युजेसच्या दुःखद निधनाच्या आठवणी ताज्या झाल्या. 

Updated: Dec 23, 2014, 02:00 PM IST
सरावात वॉटसनच्या हेल्मेटला लागला बाउंसर title=

मेलबर्न :  मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये सराव करताना जलद गती गोलंदाज जेम्स पॅटीसन याचा बॉउंसर ऑस्ट्रेलिया ऑलराउंडर शेन वॉटसनच्या हेल्मेटला लागला आणि फिल ह्युजेसच्या दुःखद निधनाच्या आठवणी ताज्या झाल्या. 

वॉटसन या घटनेनंतर हादरला आणि नेट्स सोडून पॅव्हेलियमध्ये गेला. त्यानंतर सर्व खेळाडू आणि अधिकारी वॉटसनच्या मागे गेले. यावेळी त्यांनी त्याला गंभीर दुखापत तर झाली नाही ना याची खात्री केली. 

बाउंसर सोडण्याच्या प्रयत्नात वॉटसनच्या हेल्मेटला चेंडू लागला. हा प्रहार इतका होता की तो आपल्या गुडघ्यांवर खाली पडला आणि हेल्मेट काढून चेक केले. 

यानंतर टीमचे डॉक्टर पीटर ब्रुकनेरसह मैदानातून बाहेर गेला. अनेक मिनिटे तो आपल्या हातांनी डोकं धरून बसला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रवक्त्याने सांगितले की वॉटसन हादला होता. त्यानंतर उपकर्णधार ब्रॅड हेडिनने सांगितले की, त्याला दुखापत झाली नाही. मी त्याच्याशी बोललो, तो जरा घाबरला होता पण आता सर्व काही ठीक आहे. अशी घटना घडल्यावर कोणीही घाबरतो. या पेक्षा अधिक मी काही सांगू शकत नाही कारण सांगण्यासारखे काहीच नाही. 

यानंतर वॉटसन क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या फॅमिली डे कार्यक्रमातही सहभागी झाला नाही. तो हॉटेलमध्येच होता. ह्युजेस याच्या निधनानंतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडून वेगळ्याच मानसिकतेत आहे. दोन आठवड्यांपूर्वी स्थानिक सामना खेळत असताना फिल ह्युजेसचा चेंडू लागल्यानंतर मृत्यू झाला होता. 

सराव करताना मिशेच स्टार्कच्याही गुडघ्याला दुखापत झाली. चेंडू लागल्याने तो जखमी झाला आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये स्टार्कच्या ऐवजी रायन हॅरीस खेळणार आहे. तोही जखमी झाला होता.  

चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया फिटनेसच्या समस्येने ग्रासला आहे.  कर्णधार अॅडीलेड टेस्टनंतर जखमी झाल्याने बाहेर बसला. हॅरीस ग्रोइन जखमेमुळे दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकला नाही. 

सलामी फलंदाजा डेविड वॉर्नरलाही अंगठ्याला जखम झाली आहे, पण तो तिसरी टेस्ट खेळणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.