सीरिज अर्धवट सोडून वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार

भारत वि. वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना रद्द होणार आहे. क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये वेतनावरून वाद झाला असल्यानं हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं दिलीय. याबाबतचं पत्रच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला लिहिलंय. 

PTI | Updated: Oct 17, 2014, 05:25 PM IST
सीरिज अर्धवट सोडून वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार title=

नवी दिल्ली: भारत वि. वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना रद्द होणार आहे. क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये वेतनावरून वाद झाला असल्यानं हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं दिलीय. याबाबतचं पत्रच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला लिहिलंय. 

भारत दौरा अर्धवट सोडण्याचा वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याची बीसीसीआयची प्रतिक्रिया आहे. 

सध्या चौथी वनडे मॅच धर्मशाला इथं सुरू आहे. दौऱ्यातील कोलकाता इथली पाचवी वनडे, एक टी-20 आणि तीन टेस्ट मॅचची सीरिज अजून शिल्लक असतांनाच आता वेस्ट इंडिज टीम सीरिज अर्ध्यात सोडून मायदेशी परतणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.