दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jul 30, 2016, 08:30 PM IST
दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय  title=

जमैका : दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या टेस्टमध्ये भारतीय टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. ओपनर मुरली विजय ऐवजी के.एल.राहुलला संधी देण्यात आली आहे. 

मुरली विजय पहिल्या टेस्टमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासूनच तो ही टेस्ट खेळेल का नाही याबाबत साशंकता होती.

भारतीय टीममध्ये यांना संधी 

के.एल.राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान सहा, आर.अश्विन, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव