राजकोट वनडे पराभवाची अनेक कारणं सांगितली धोनीने

 टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर म्हटले की २७१ धावांचे लक्ष्य प्राप्त करणे शक्य होते, पण खेळपट्टी धीमी होत गेली, त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले. 

Updated: Oct 19, 2015, 11:45 AM IST
राजकोट वनडे पराभवाची अनेक कारणं सांगितली धोनीने  title=

राजकोट :  टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर म्हटले की २७१ धावांचे लक्ष्य प्राप्त करणे शक्य होते, पण खेळपट्टी धीमी होत गेली, त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले. 

दक्षिण आफ्रिकेच्या २७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ६ विकेट गमावून फक्त २५२ धावा केल्या. भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 

धोनीने भारताच्या पराभवानंतर म्हटले की, मला वाटते की २७० हा चेस करू शकणारा स्कोअर होता. आम्हांला वाटले की विकेट समान असेल, पण तसे झाले नाही. त्यानंतर मैदानात दवं पडलं नाही, त्यामुळे आम्हांला काहीच मदत मिळाली नाही. तसेच विकेटवर काही चेंडू जोरात तर काही थांबून येत होते. त्यामुळे शॉर्ट खेळणे कठीण झाले होते. 

पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर खेळणाऱ्या फलंदाजांना मी शोधत असल्याचंही धोनीने म्हटले आहे. कोणालाही अनुभव न देता हे शक्य नाही. त्यामुळे या स्थानांवर खेळत नाही तोपर्यंत त्यासाठी कोण चांगले आहे हे समजू शकणार नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.