जेव्हा हरभजनने घेतला विराटचा इंटरव्यू

अखेरच्या सामन्यात सात विकेट राखून विजय मिळवल्यानंतर हरभजन सिंगने विराट कोहलीता मजेदार इंटरव्यू घेतला.

Updated: Feb 2, 2016, 08:12 AM IST
जेव्हा हरभजनने घेतला विराटचा इंटरव्यू title=

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला टी-२० सिरीजमध्ये धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. अखेरच्या सामन्यात सात विकेट राखून विजय मिळवल्यानंतर हरभजन सिंगने विराट कोहलीता मजेदार इंटरव्यू घेतला.

यावेळी हरभजनने विराटला मी तुला कोणत्या नावाने हाक मारु? मिस्टर कन्सिस्टेन्ट की सुपरमॅन? असे विचारले असता विराट म्हणाला मला माझ्याच नावाने हाक मारा. 

सकाळी नाश्त्यात तुम्ही काय खाता या हरभजनच्या दुसऱ्या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला, नाश्त्याआधी मी सकाळी लवकर उठतो आणि सर्वांच्या आधी नाश्ता करायला पोहोचतो. हरभजनने मात्र त्याचे हे वाक्य खोडून काढले. 

नुकत्याच झालेल्या टी-२० सीरिजमध्ये विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. 

 

VIDEO: When Harbhajan Singh turned into a reporter and interviewed Virat Kohli after the 3-0 win in T20Is at SCG...

Posted by Indian Cricket Team on Sunday, January 31, 2016