मुंबईकर रोहित शर्मासोबतची 'ती' कोण?

पर्थमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच उद्या ६ मार्चला होळीला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टीससोबतच थोडा वेळ काढून शहरात फिरण्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र फिरतांना रोहित शर्मा नेहमी एका मुलीसोबत दिसतो. कोण आहे ही तरूणी?

Updated: Mar 5, 2015, 04:31 PM IST
मुंबईकर रोहित शर्मासोबतची 'ती' कोण?   title=

पर्थ: पर्थमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच उद्या ६ मार्चला होळीला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टीससोबतच थोडा वेळ काढून शहरात फिरण्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र फिरतांना रोहित शर्मा नेहमी एका मुलीसोबत दिसतो. कोण आहे ही तरूणी?

बीसीसीआयनं वर्ल्डकपमध्ये प्रेयसी अथवा पत्नीला सोबत नेण्यास भारतीय क्रिकेटपटूंवर बंदी घातली असली तरी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पर्थमध्ये एका तरुणीसोबत फिरताना दिसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. या वृत्तावर रोहितनं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 

टीम इंडिया सध्या पर्थच्या ह्यात रिजन्सी या हॉटेलमध्ये राहत आहे. रोहित शर्मा हयात रिजन्सीपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला. या हॉटेलमध्ये रोहितसोबत एक तरुणी दिसते. याच तरुणीसोबत रोहितनं डिनरही घेतल्याचं समोर आलंय. हे दोघंही पर्थमधील रस्त्यावर चालत फिरताना दिसत असून हा सर्व प्रकार एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रोहितसोबतची ती तरुणी कोण याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.