अनुराग ठाकुर नंतर कोण होणार बीसीसीआयचा नवा अध्यक्ष ?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनुराग ठाकुर यांच्या नावापुढे आता माजी अध्यक्ष, बीसीसीआय असा म्हटलं जाणार आहे. कोर्टाचा निकाल आहे की, सध्या सर्वात वरिष्ठ उपाध्यक्षांनी संयुक्त सचिवांसोबत मिळून बोर्डाचं कामकाज पाहावं, पण आता प्रश्न आहे की पाच उपाध्यक्षांमध्ये कोण कार्यवाहक प्रमुख बनणार आहे.

Updated: Jan 3, 2017, 08:12 AM IST
अनुराग ठाकुर नंतर कोण होणार बीसीसीआयचा नवा अध्यक्ष ? title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनुराग ठाकुर यांच्या नावापुढे आता माजी अध्यक्ष, बीसीसीआय असा म्हटलं जाणार आहे. कोर्टाचा निकाल आहे की, सध्या सर्वात वरिष्ठ उपाध्यक्षांनी संयुक्त सचिवांसोबत मिळून बोर्डाचं कामकाज पाहावं, पण आता प्रश्न आहे की पाच उपाध्यक्षांमध्ये कोण कार्यवाहक प्रमुख बनणार आहे.

वरिष्ठ आणि अनुभवाने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघांचे डीडीसीए सी.के खन्ना सर्वात पुढे आहेत. खन्ना तिसऱ्यांदा उपाध्यक्ष बनले आहेत.  बोर्डात ते सेंट्रल झोनचं प्रतिनिधीत्व करतात.

६४ वर्षांचे खन्ना यांच्यानंतर नाव येतं ते वेस्टर्न झोनचे टीसी मैथ्यू, त्यानंतर गौतम रॉय, एमएल नेहरू आणि के जी. गंगाराजू यांचं. भारतीय क्रिकेट बोर्डमध्ये ९ वर्षाचा अनुभव असणारे खन्ना यांचं वय ७० होण्यासाठी अजून ६ वर्ष बाकी आहेत.

जगमोहन डालमिया यांच्या कार्यकाळात ते उपाध्यक् होते. मे मध्ये देखील त्यांनी विशेष बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं आहे. पण त्यांच्याआधी अनुराग ठाकुर आणि अजय शिर्के यांनी संधी मिळाली होती.

जस्टिल मुकुल मुदगल यांनी डीडीसीएबाबत हायकोर्टात दिलेल्या एका रिपोर्टमध्ये खन्ना यांना घातक ठरवलं आहे. खन्ना यांच्याशिवाय असम क्रिकेट संघांचे गौतम राय उपाध्यक्षच्या रूपात दुसरा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. ते 2000 ते 2015 पर्यंत एसीए अध्यक्ष होते. 

खन्ना आणि राय एक दशकाहून अधिक राज्याचं प्रतिनिधित्व करत आहे. सौरव गांगुलीचं नाव देखील चर्चेत आहे.