..तर 'ही' अभिनेत्री होणार धोनीची पत्नी

  टीम इंडियाचा सर्वाच यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवला जात आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. मात्र पत्नी साक्षीच्या भूमिकेत कोण असणार हे अजून निश्चित झालं नाही.

Updated: May 7, 2015, 05:13 PM IST
..तर 'ही' अभिनेत्री होणार धोनीची पत्नी title=

मुंबई :  टीम इंडियाचा सर्वाच यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवला जात आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. मात्र पत्नी साक्षीच्या भूमिकेत कोण असणार हे अजून निश्चित झालं नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी तीन अभिनेत्रींची नावे पुढे येत आहेत. श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, कृती सेनन या अभिनेत्रीपैकी एक या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन निरज पांडे याने केलं आहे. या सिनेमात धोनीच्या प्रोफेशनलच नाही तर वैयक्तीक आयुष्याची झलक देखील त्याच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

धोनी आणि साक्षी एका मित्राच्या मदतीने एकमेकांना भेटले होते. मार्च २००८ मध्ये त्यांना एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जुलै २०१२ त्यांनी लग्नही केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.