सानिया मिर्झाला ताज महालमध्ये नो एंट्री

Updated: Oct 8, 2014, 05:42 PM IST
सानिया मिर्झाला ताज महालमध्ये नो एंट्री title=

आग्राः मंगळवारी संध्याकाळी सानिया मिर्झा ही ताज महल पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला ताज महालमध्ये जाऊ दिले नाही.

कारण ताज महाल पाहण्याची वेळ संपली होती. तेव्हा महालचे दरवाजे देखील बंद झाले होते. त्यामुळे तिला आत जाण्यास मनाई केली होती.

सानिया मिर्झा आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार अनिल कुंबळे हे दोघेजण एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आग्र्याला गेले होते. मात्र, कुंबळेनी ताज महालसारखी अप्रतिम कलाकृती पाहून त्याचा आनंद घेतला. पण, सानिया मिर्झा मात्र लांबूनच फोटो काढत राहिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.