IPL 2017 : युवराजचा डेडली शॉट... थोडक्यात बचावला विजय शंकर WATCH VIDEO

 आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये कोलकता नाइट रायडर्स विरूद्ध हैदराबाद सामन्यात युवराज सिंग याने समोर  जबरदस्त आणि जोरदार फटका लगावला. युवराजने आपल्या खेळीत दोन चौकार लगावले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 18, 2017, 05:31 PM IST
IPL 2017 :  युवराजचा डेडली शॉट... थोडक्यात बचावला विजय शंकर WATCH VIDEO

बंगळुरू :  आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये कोलकता नाइट रायडर्स विरूद्ध हैदराबाद सामन्यात युवराज सिंग याने समोर  जबरदस्त आणि जोरदार फटका लगावला. युवराजने आपल्या खेळीत दोन चौकार लगावले. 

आपल्या या खेळीत त्याने ९ धावा काढल्या पण १५ षटकातील पीयूष चावलाच्या  दुसऱ्या चेंडूवर समोर फटका लगावला. तो इतका जोरदार होता की नॉन स्टाइकर एन्डवर असलेला फलंदाज विजय शंकर यांच्या डोक्यावर आदळला असता. विजय शंकर याने हेल्मेट परिधान केले नव्हते. 

 

समोरून चेंडू आल्यावर विजय शंकरने बचावात्मक पवित्रा घेत. जमीनीवर लोटांगण घातल आपल्याला वाचवलं. विजय शंकर याने एका सेकंदाचा उशीर केला असता तर त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असती.