सामन्यादरम्यान युवराजच्या छातीवर बॉल जोरात आदळला आणि...

क्रिकेटच्या मैदानावर सामन्यादरम्यान क्रिकेटपटू जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. कोलकाताच्या ईडन गार्डनवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराजला लहानशी दुखापत झाली.

Updated: Jan 23, 2017, 11:57 AM IST
सामन्यादरम्यान युवराजच्या छातीवर बॉल जोरात आदळला आणि... title=

कोलकाता : क्रिकेटच्या मैदानावर सामन्यादरम्यान क्रिकेटपटू जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. कोलकाताच्या ईडन गार्डनवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराजला लहानशी दुखापत झाली.

या वनडेत युवराजने ४५ धावांची खेळी केली. १०व्या षटकादरम्यान जॅक बॉलने टाकलेला चेंडू युवराजच्या छातीवर जोरदार आदळला. या बॉलचा वेग इतका होता की युवराजच्या हातातील बॅटच खाली पडली. त्याला काही काळ श्वास घेणेही कठीण झाले होते. 

बॉल लागल्यानंतर अंपायरनी ताबडतोब जाऊन युवराजची विचारपूस केली. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या विराटनेही युवराजची विचारपूस करत त्याला चीअर केले. काही वेळानंतर त्याने पुन्हा खेळाला सुरुवात केली. त्याने कोहलीसह खेळताना ६५ धावांची खेळी केली.