मिसबाह, युनुस खानचा क्रिकेटला अलविदा, युवराजचे भावनात्मक ट्वीट

पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मिसबाह उल हक आणि यशस्वी कसोटी फलंदाज युनुस खान यांनी क्रिकेटला अलविदा म्हटलंय. दोन्ही फलंदाजांनी वेस्टइंडिजविरुद्ध विंडसर पार्क मैदानावर अखेरचा सामना खेळला. 

Updated: May 16, 2017, 06:08 PM IST
मिसबाह, युनुस खानचा क्रिकेटला अलविदा, युवराजचे भावनात्मक ट्वीट title=

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मिसबाह उल हक आणि यशस्वी कसोटी फलंदाज यांनी क्रिकेटला अलविदा म्हटलंय. दोन्ही फलंदाजांनी वेस्टइंडिजविरुद्ध विंडसर पार्क मैदानावर अखेरचा सामना खेळला. 

या कसोटी मालिकेत पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध २-१ असा विजय मिळवला. क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या या दोन पाकिस्तानी फलंदाजांना भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगनेही भावनात्मक ट्विटद्वारे फेअरवेल दिलंय.

युवराजने ट्विटररव म्हटलंय, पाकिस्तान क्रिकेटच्या दोन महान क्रिकेटपटूंना गुडबाय, कर्णधार मिसबाह उल हक आणि युनुस खान यांचे क्रिकेटमधील योगदान नेहमीच प्रेरणा देत राहील.