आणि विराट ढसाढसा रडला!

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, October 3, 2012 - 17:37

www.24taas.com, कोलंबो
सुपर ८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १२१ धावांत रोखता न आल्याने भारताचा टी-२० विश्वचषकातील गाशा गुंडाळला आणि यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला अक्षरशः रडू कोसळले. तो बराच वेळ रडत होता.
भारताने दक्षिण आफ्रिकेवर एका धावेने विजय मिळवला. परंतु, सेमी फायनलमध्ये जाणाच्या शक्यता नसल्याने भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंच्या डोळ्यात पाणी तरळले. विराट कोहलीला या सामन्यात चांगली कामगिरी करून न शकल्याने स्वतःला दोषी मानत होता. त्यामुळे भारत सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार नाही हे समजल्यावर त्याचे हे दुःख अश्रूच्या रुपाने बाहेर पडले आणि तो बराच वेळ रडत होता.
विराटच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. आपण काही करू शकलो नाही याची खंत होती. त्याने आपले अश्रू पुसण्यासाठी आपल्या टी-शर्टाची मदत घेतली होती. आभाळाकडे पाहत तो बराच वेळ रडत होता. काही वेळ तो स्तब्ध उभा राहीला आणि नंतर संघातील आपल्या सहकार्यांसह ड्रेसिंग रूममध्ये गेला.
कोणत्याही खेळात हार-जीत असते, परंतु, पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवूनही सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही, ही सल भारतीय संघाच्या मनात कायम राहील हे निश्चित.

First Published: Wednesday, October 3, 2012 - 17:21
comments powered by Disqus