वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड चॅम्पियन!

वेस्ट इंडियन टीमनं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकलाय. 1975 आणि 1979मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विंडीज टीमला एकही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकता आली नव्हती.तब्बल 33 वर्षांनी विंडीज टीम वर्ल्ड चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 7, 2012, 10:57 PM IST

www.24taas.com, कोलंबो
वेस्ट इंडियन टीमनं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकलाय. 1975 आणि 1979मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विंडीज टीमला एकही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकता आली नव्हती.तब्बल 33 वर्षांनी विंडीज टीम वर्ल्ड चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलंय.
मारलेन सॅम्यूअल्सच्या ७८ धावांच्या जोरावर वेस्ट इंडीजने हा विजय मिळविला.वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला १३८ धावांचे आव्हान दिले. त्याचा पाठलाग करताना श्रीलंकने सर्वबाद १०१ धावा केल्या.
चांगली सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेचा डाव पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे तीन फलंदाज केवळ दोन धावा करुन बाद झाले. कुमार संगकाराने 22 धावा आणि कर्णधार जयवर्धनेने 33 धावा केल्या. मात्र, ते जास्तवेळ क्रिजवर टीकू शकले नाही.
आज झालेली टी-20 वर्ल्ड कपची फायनल विंडीजसाठी केवळ किताबी जंग नाही. तर विंडीजचे सोनेरी दिवस परत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये विंडीज टीमनं आपली वेगळी छाप सोडली आहे. आता फायनलमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी सॅमी अँड कंपनी तयार होती.