धोनी सुट्टी घेऊन चाललाय तरी कुठे?

टीम इंडियाच्या फॅन्सना सध्या एक प्रश्न सतावतोय की, कॅप्टन धोनी सुट्टीवर का? कसलं सेलिब्रिशन करण्यासाठी माही अँड कंपनी जातेय.

Updated: Sep 25, 2012, 12:15 PM IST

www.24taas.com, कोलंबो
टीम इंडियाच्या फॅन्सना सध्या एक प्रश्न सतावतोय की, कॅप्टन धोनी सुट्टीवर का? कसलं सेलिब्रिशन करण्यासाठी माही अँड कंपनी जातेय. हेच सागंण्यासाठी आम्ही तुम्हाला पाच वर्ष मागे नेतोय. दिनांक 24 सप्टेंबर 2007..... कॅप्टन धोनीची सुट्टी का ?
हॉटेलमधून माही कुठे जाणार ?
धोनीला का आली मित्रांची आठवण?

तुम्हाला विश्वास बसत नसेल तर, धोनीचं ट्विटर अकाऊंट पाहा.... यावर धोनीनं स्पष्ट लिहींल आहे की, तो सुट्टीवर आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की, माहीनं अखेर सुट्टी का घेतली ? कॅप्टन कूलच्या सुट्टीचं कारण आहे तरी काय ?

हा दिवस तुमच्या अजूनही लक्षात असणार आहे. 2007 हा तो विजय आहे ज्या विजयामुळे टीम इंडिया टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. जर तुम्ही विसरला असाल तर, आम्ही तुम्हाला याची आठवण पुन्हा एकदा करून देतोय. 24 सप्टेंबर 2007 याच तारखेला भारतीय टीमनं पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं.

धोनी करणार विजयाचं सेलिब्रेशन ?

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं प्रॅक्टिस सेशनमधून सुट्टी घेतली आहे. आणि सध्या माही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. ही पार्टी कशी असणार याची खुद्द कॅप्टन धोनीलाही कल्पना नाही. कारण माहीला त्याच्या टीम मेट्सनी सरप्राईज पार्टी देण्याचं ठरवलंय. हे सेलिब्रेशन संपूर्ण टीमचं असणार आहे. आज मैदानावर कसलही टेन्शन राहणार नाही... ना मुकाबल्याचं प्रेशर... केवळ असणार आहे ते सेलिब्रेशन.... मस्ती आणि 2007 वर्ल्ड कप विजयाच्या आठवणी....