ऑडीचे नवीन मॉडेल `एस६`

Last Updated: Saturday, July 13, 2013 - 17:16

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

लक्झरी कार बनवणारी जर्मन कंपनी ऑडीने भारतीय बाजारात नवीन मॉडेल ऑडी एस-६ लाँच केली आहे. कंपनीने या कारमध्ये ४ लीटरची क्षमता असलेल्या टीएफएसआय वी८ चे दमदार इंजिन बसवले आहे.. ही कार ४२०पीएस ची पॉवर देते.

ऑडीच्या या नव्या कारची किंमत ८५.९९ लाख रुपये इतकी आहे. आकर्षक आणि दमदार इंजिनची क्षमता असलेल्या या कारमध्ये ७ स्पीड ड्युअल क्लच आणि एस ट्रॉनिक गिअर बॉक्सजचा वापर करण्यात आलाय. या कारचा पिकअपही चांगला आहे. कंपनीने असा दावा केलाय की, ऑडी एस६ ही कार ४.६ सेकंदात १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते. ऑडी एस६ या गाडीचा जास्तीत जास्त वेग २५० किलोमीटर प्रतितास इतका आहे.

‘आम्हाला खूप आनंद होतोय की, आम्ही एकापाठोपाठ एक नव्या कार बाजारात आणून लोकांना गाड्यांमध्ये विविध पर्याय देतोय’ असं ऑडी इंडियाचे प्रमुख मायकल पर्शके ऑडी एस-6 च्या लाँचिंगच्या वेळी म्हणाले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Saturday, July 13, 2013 - 17:16


comments powered by Disqus