'सॅमसंग गॅलक्सी गिअर' आधुनिक स्मार्टवॉच बाजारात

By Jaywant Patil | Last Updated: Friday, September 6, 2013 - 06:33

www.24taas.com, झी मीडिया, सियोल
हल्ली नवनव्या अद्ययावत उपकरणांमुळे घड्याळ ही एकेकाळची आवश्यक गोष्ट हातावरून नाहिशी होऊ लागली आहे. मोबाइलवरच वेळ पाहाणं हल्ली वाढत आहे. त्यामुळे घड्याळानेही आपलं रूप बदलण्यास सुरूवात केली आहे. `गॅलॅक्सी गीयर्स` हे नवं उपकरण घड्याळाचीच पुढची पीढी आहे.
गॅलॅक्सी गीयर मनगटावर घड्याळासारखं वापरता येतं. पण हे केवळ वेळच दाखवण्यासाठी नाही. तर हे मोबाईलसारखं वापरता येऊ शकतं. या घड्याळाने फोन करता येऊ शकतो. एसएमएस करता येऊ शकतो. आणि या घड्याळाने फोटोसुद्धा काढता येतात. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने गुरूवारी बर्लिनच्या ट्रेड शोमध्ये गॅलॅक्सी गीयर्स सादर केलं.
या गॅलॅक्सी गीयर्समध्ये १.९ मेगापिक्सल कॅमेरा आहे. या घड्याळातून फोटो काढता येतात. तसंच व्हिडिओही शूट करता येऊ शकतो. घड्याळाच्या स्क्रीनला स्पर्श न करता केवळ आवाजाच्या माध्यमातून एसएमएस करता येऊ शकतो. या गॅलॅक्सी गीयर्समध्ये ब्लूटूथही आहे. सॅमसंग गॅलॅक्सी नोट ३ ची सर्व वैशिष्टंय यात आहेत. आवाजामुळे हे यंत्र नियंत्रित होऊ शकतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013 - 16:17
comments powered by Disqus