पेट्रोलवर नाही तर गायी-म्हशीच्या शेणावर धावणार ही कार...

गायीच्या शेणाचा उपयोग गोबर गॅस तसंच खत म्हणूनही देशात अनेक ठिकाणी केला जातो. पण याच शेणाचा उपयोग जर इंधनासारखा केला तर...

Updated: Jul 31, 2015, 02:45 PM IST
पेट्रोलवर नाही तर गायी-म्हशीच्या शेणावर धावणार ही कार... title=

नवी दिल्ली : गायीच्या शेणाचा उपयोग गोबर गॅस तसंच खत म्हणूनही देशात अनेक ठिकाणी केला जातो. पण याच शेणाचा उपयोग जर इंधनासारखा केला तर...

होय, हे शक्य आहे... यामुळे ना केवळ इंधन बचत होते तर धुरामुळं होणारं प्रदूषणही कमी होण्यास यामुळे मदत मिळेल. टोयोटा या कार बनवणाऱ्या एका कंपनीनं अशा कारची निर्मिती केलीय जी गायीच्या शेणाच्या खतापासून बनवलेल्या हायड्रोजनवर ही कार चालते असं कंपनीच्या जाहिरातीत म्हटलंय.

या कारचं नाव 'मिराई फ्यूल सेल कार' असे असून ही कार चक्क गायीच्या शेणावर चालते. याशिवाय इतर इंधनांवरही ही गाडी काम करू शकेल. कंपनी लवकरच या कारला बाजारात आणण्याच्या विचारात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.