चमत्कार घडणार, चंद्रावर चक्क भाजी पिकणार!

अवकाशामध्ये शेती हे ऐकून विचित्र वाटतं ना! पण हे खरं आहे. पण भविष्यात अवकाशात झेपावणाऱ्या अंतराळवीरांसाठी चंद्र, मंगळावर अन्न आणि ऑक्सिजन पुरवण्यसाठी चीनमधील प्रयोगशाळेत यावर आश्चर्यजनक प्रयोग सुरू झाले आहेत.

जयवंत पाटील | Updated: Dec 3, 2012, 04:52 PM IST

www.24taas.com, बीजिंग
अवकाशामध्ये शेती हे ऐकून विचित्र वाटतं ना! पण हे खरं आहे. पण भविष्यात अवकाशात झेपावणाऱ्या अंतराळवीरांसाठी चंद्र, मंगळावर अन्न आणि ऑक्सिजन पुरवण्यसाठी चीनमधील प्रयोगशाळेत यावर आश्चर्यजनक प्रयोग सुरू झाले आहेत.
चायनिज अवकाश संशोधन आणि प्रशिश्क्षण केंद्राचे उपसंचालक डेंग यिबिंग यांनी या प्रयोगाची कबुली दिली आहेत. ते म्हणाले की, आमच्या नव्या प्रयोगामध्ये आम्ही अंतराळात कृत्रिम ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साइड आणि H2O म्हणजेच पाणी यांचा समतोल साधत मनुष्य आणि झाडं जगवण्याचा प्रयत्न करत आहोत.
या प्रयोगामध्ये एक ३०० मीटरच्या केबिनमध्ये अंतराळातील वातावरण निर्माण करून त्यात कार्बनडाय ऑक्साइडवर जगणाऱ्या काही वनस्पती आणि दोन माणसं ठेवण्यत आली आहेत. ही माणसं आपल्या आहारासाठी आवश्यक शेती करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात अंतराळवीरांना त्याचा फायदा होईल. तसंच त्यांना अधिक काळ दुसऱ्या ग्रहांवर वास्तव्य करता येईल. जर्मनीतील शास्त्रज्ञही याच संदर्भात प्रयोग करत आहेत.