`आयफोन`मधून ईमेल आणि मॅसेजिंगची हॅकिंग शक्य

Last Updated: Sunday, February 23, 2014 - 11:09

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयफोनच्या सॉफ्टवेअरमध्ये एक चूक असल्याचं लक्षात आलं आहे, यामुळे आयफोनच्या हॅकिंगचा धोका वाढला आहे. तसेच आयफोनमधून पाठवले जाणारे ईमेल तसेच इतर कम्युनिकेशन टुल्स हॅक होण्याची शक्यता वाढली आहे.
आयफोन बनवणारी कंपनी ऍपलने शुक्रवारीही घोषणा केली.
एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार हॅकर कोणत्याही फ्री वाय-फाय नेटवर्कचा वापर करतात, तेथून वायफाय यूझर्स कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधतात, तो हॅक होऊ शकतो. म्हणजेच हॅकरला हे माहित करता येईल की, ऍपल युझर कोणाशी आणि काय बोलतोय.
तसेच युझर हा फेसबुकवर लिहितोय, जीमेलवरून काय मेल पाठवतोय, हे सर्व काही त्याला क्षणात कळणार आहे.
ऍपले मात्र हे स्पष्ट केलंल नाही, की ऍप्पलला ही चूक कशी कळली. या चुकीचा कुणी आतापर्यंत फायदा घेतला आहे का, कुणाची तक्रार आली आहे का? हे ऍपले स्पष्ट केललं नाही.
मात्र ऍपलला सपोर्ट करणाऱ्या एका वेबसाईटने स्पष्टीकरण देतांना म्हटलंय, कंपनीने काही सॉफ्टवेअर जारी केले आहेत. यामुळे आयफोन ४ जी सिस्टम अपडेट होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014 - 11:09
comments powered by Disqus