फेसबुक भारतीयांना बनवतंय मालामाल!

आता फेसबुक भारतीयांना श्रीमंत बनवतंय, असं म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही. कारण, आपल्या मिळकतीतला सर्वात मोठा भाग फेसबुककडून भारतीयांकडेच येतो, असं फेसबुकनंच जाहीर केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 5, 2013, 11:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आता फेसबुक भारतीयांना श्रीमंत बनवतंय, असं म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही. कारण, आपल्या मिळकतीतला सर्वात मोठा भाग फेसबुककडून भारतीयांकडेच येतो, असं फेसबुकनंच जाहीर केलंय.
सोशल नेटवर्किंग सॉईट फेसबुकच्या म्हणण्यानुसार, फेसबुकनं आपल्या साईटवर बग म्हणजेच कम्प्युटरच्या प्रोग्रामिंगमध्ये येणाऱ्या एररची माहिती देणाऱ्या संशोधकांना गेल्या दोन वर्षांत १० लाख डॉलर (जवळजवळ ६ करोड रुपये) मोबदला म्हणून दिलाय.
हा मोबदला मिळवण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयटी क्षेत्रातील लोकांना अर्थातच याचा फायदा झालाय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारतातील फेसबुक युजर्सची संख्या सध्या जवळजवळ ७.८ करोडवर पोहचलीय. फेसबुकच्या ‘बग बाऊंटी’ सुविधेचा फायदाही सर्वात जास्त भारतीयांनीच घेतलाय. `बग बाऊंटी`मध्ये बगची सूचना दिल्यानंतर बक्षीस मिळण्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बग बाऊंटी प्रोग्राम
फेसबुकला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आखण्यात आलीय. हा पुरस्कार आत्तापर्यंत ३२९ लोकांना दिला गेलाय. यामध्ये एका १३ वर्षांच्या विजेत्याचाही समावेश आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.