फेसबुकवर येणार `ट्रेंडिंग टॉपिक`, फेसबुकवरील चर्चा होणार `महाचर्चा`

ट्वीटरला ट्रेडिंग टॉपिकने सुपरहिट केल्यानंतर आता फेसबुकवरही ट्रेन्ड दिसणार आहे. हे नवं फीचर फेसबुकमध्ये सामिल करण्यात आलं आहे. ट्वीटरप्रमाणे फेसबुकला याचा किती फायदा होतो, हे लवकरच दिसून येणार आहे.

Updated: Jan 20, 2014, 06:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ट्वीटरला ट्रेडिंग टॉपिकने सुपरहिट केल्यानंतर आता फेसबुकवरही ट्रेन्ड दिसणार आहे. हे नवं फीचर फेसबुकमध्ये सामिल करण्यात आलं आहे. ट्वीटरप्रमाणे फेसबुकला याचा किती फायदा होतो, हे लवकरच दिसून येणार आहे.
कोणता विषय ट्रेंडिंग आहे, म्हणजे फेसबुक युझर्स सर्वात जास्त कोणत्या विषयावर चर्चा करतायत, हे या ट्रेडिंग टॉपिंकवरून सर्व युझर्सना कळणार आहे. यामुळे फेसबुकवरील चर्चा आता महाचर्चा होणार आहे.
ही सुविधा सध्या काही देशातील युझर्सना आहे. टप्प्याटप्याने ही सर्व देशात दिसणार आहे. प्रोफाईलच्या डाव्या बाजूला ट्रेडिंग नावाने ही सुविधा दिसते.
फक्त ट्रेडिंग टॉपिक नाही तर जगभरातील कोणत्या देशात?, कोणत्या शहरात?, कोणता विषय ट्रेडिंग आहे?, हे देखील फेसबुक देणार आहे.
फेसबुकने ट्रेडिंग देण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. मात्र प्रत्यक्षात आता फेसबुकला याचा किती फायदा होणार आहे. हे काही काळाने समजणार आहे.
मात्र फेसबुकचा या मागील उद्देश सफल होण्याची चिन्ह आहेत. कारण ट्रेडिंग टॉपिक आल्याने युझर्स जास्तच जास्त त्या विषयावर चर्चा करणार आहेत, यामुळे फेसबुकवर थांबून चर्चा करण्याचा वेळ वाढणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.