फेसबूक खरेदी करणार वॉट्सअप १२ बिलियन डॉलरला

सध्या सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या वॉट्स ऍपविषयी... फेसबुक आता वॉट्स ऍप विकत घेणारेय...16 बिलियन डॉलर्सला फेसबुक वॉट्स ऍप खरेदी करण्याचा व्यवहार करणारेय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 20, 2014, 10:32 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
सध्या सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या वॉट्स ऍपविषयी... फेसबुक आता वॉट्स ऍप विकत घेणारेय...16 बिलियन डॉलर्सला फेसबुक वॉट्स ऍप खरेदी करण्याचा व्यवहार करणारेय...
4 बिलियन डॉलर्स रोख रक्कम आणि 12 बिलियन डॉलर स्टॉक्सच्या स्वरुपात विकत घेण्याचा हा व्यवहार झालाय... फेसबुकचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्गनं यासंदर्भातील घोषणा केलीय...
जगात आपल्या सोशल नेटवर्कला वाढविण्यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. बाजारात मोबाईल मेसेजिंगचे वाढते प्रमाण पाहतात फेसबूकने वॉट्सअप खरेदीचा निर्णय घेतला आहे. सोशल नेटवर्कवर फोटो आणि यू-ट्यूब व्हिडिओ शेअर करण्यासाठी उपयोग होणाऱ्या वॉट्सअपद्वारे जगभरात आपले म्हणणे जलद गतीने पोहविण्यासाठी चांगले माध्यम आहे.

सोशल नेटवर्किंगमध्ये वॉट्स अप खूप नंतर आले पण स्मार्टफोनवर त्याचा इझी एक्सेसने त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि इतर ऍप्सच्या पुढे याला नेले आहे. वॉट्सअपशी दररोज एक लाख जण जोडले जात आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.