`व्हॉट्‌सअॅप`वर फसव्या मॅसेजला ऊत..., fake messages on whatsapp

`व्हॉट्‌सअॅप`वर फसव्या मॅसेजला ऊत...

`व्हॉट्‌सअॅप`वर फसव्या मॅसेजला ऊत...

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

‘व्हॉट्‌सअॅप`चे अमर्यादीत यूजर्सची संख्या लक्षात घेऊन हा मॅसेज तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या सगळ्यांना पाठवा अन्यथा तुमचं ‘व्हॉट्‌सअॅप` बंद होईल, अशा अर्थाचा मॅसेज तुम्हालाही आला असेल... पण, या भूल थापांना बळी पडण्याचं काहीही कारण नाही. हा मॅसेज फसवा आहे.

आरोही देशमुख (‘व्हॉट्‌सअॅप`ची सीईओ) या किंवा अशाच काही नावांनी हा मॅसेज सध्या ‘व्हॉट्‌सअॅप`च्या साहाय्यानं अनेक मोबाईलवर फिरत आहे.

‘व्हॉट्‌सअॅप` या लोकप्रिय मेसेंजर अॅप्लिकेशनवर सध्या फसवे संदेश फिरत असल्याचे उघड झाले आहे. अँडी आणि जॉन या नावाने येणारा एक संदेश आणखी दहा जणांना न पाठविल्यास तुम्ही अकार्यरत (इनऍक्टिव्ह युजर) असल्याचे समजण्यात येईल, अशी धमकी या संदेशातून देण्यात येत आहे. अशा संदेशांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘तुम्ही हा मॅसेज फॉरवर्ड केला नाहीत तर तुमचं अकाऊंट अकार्यरत असल्याचं समजून ते बंद करण्यात येईल. तुम्हाला तुमचं अकाऊंट परत सुरू करायचं असेल तर तुम्हाला दर महिन्याला २५ रुपये जादा भरावे लागतील. तसंच काही फोटो व्हॉटसअॅपवर दिसत नाहीत ही बाब आमच्या लक्षात आलीय. त्यावर काम सध्या सुरू आहे. पण, तुम्हाला फ्री व्हॉटसअॅप अॅक्टीव्ह ठेवायचं असेल तर किमान आठ जणांना हा मॅसेज फॉरवर्ड करा त्यानंतर तुमचा लोगो हिरव्या रंगात बदलेल’ असा हा मॅसेज सध्या परसतोय.

‘असं न केल्यास तुमचे संपर्क क्रमांक गमावून बसाल’ अशी धमकीही या फसव्या संदेशातून देण्यात येतेय. परंतु हा मॅसेज फसवा असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. नेटिझन्सची फसवणूक होऊ नये यासाठी ‘व्हॉट्‌सअॅप’च्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधण्यात येत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

मग, तुम्हालाही असा मॅसेज आला असेल तर तुम्ही हा मॅसेज कुणालाही फॉरवर्ड करण्याची गरज नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 12:19


comments powered by Disqus