'आयफोन'नं घेतला तिचा जीव!

Last Updated: Monday, July 15, 2013 - 12:51

www.24taas.com,झी मीडिया,बीजिंग
मोबाईलच्या दुनियेतील अग्रगण्य समजली जाणारी कंपनी म्हणजे अॅपल... परंतु, याच कंपनीच्या एका महागड्या आय-फोनमुळे एका युवतीला तिचा जीव गमवावा लागलाय.
आयफोन चार्जिंगला लावलेला असतानाच कॉल रिसीव्ह केल्यानंतर लागलेल्या विजेच्या झटक्यानं एका युवतीचा मृत्यू झालाय. `मा` असं या युवतीचं नाव आहे. ही युवती चीनच्या उत्तर भागात राहते.
'अॅपल'ने या संदर्भात पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तसंच याबद्दल चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय.
आपल्याकडे जशी ट्विटरही सोशल नेटवर्किंग साईट आहे त्याचप्रमाणे चीनमध्य़े ‘सिना वेईबो’ ही साईट आहे जिच्यावर पीडितेच्या बहिणीने या अपघाताबद्दल लिहिलंय. ‘मा’ हिचा आयफोन चार्ज होत होता. त्याचवेळी तिचा फोन वाजला. मा हिने कॉल घेण्याचा प्रयत्न केला असता तिला विजेचा जोरात झटका लागला आणि या झटक्याने तिचा मृत्यू झाला. 'मला आशा आहे की अॅपल कंपनी यासंबधी योग्य स्पष्टीकरण देईल', असे पीडितेच्या बहिणीने ‘सिना वेईबो’ या साईटवर लिहिलंय. या घटनेत आपल्या बहिणीला गमावणाऱ्या 'अइलुन' हिने फोनची चार्जिंग चालू असताना फोनचा वापर करु नका असा सल्लाही इतरांना दिलाय.

'झिनजियांग' शहरातील २३ वर्षीय मा ही चायनातील दक्षिण एअरलाईन्समध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून काम पाहत होती. आम्हाला 'अॅपल'कडून न्यायाची अपेक्षा आहे असे अइलुनने म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 15, 2013 - 12:01
comments powered by Disqus