पृथ्वीजवळील पाच नव्या ग्रहांचा शोध लागला

संशोधकांना पृथ्वीच्या नजीक असणाऱ्या ५ नवीन ग्रहांचा शोध लागला आहे. यातला एक ग्रह अशा ताऱ्याचा कक्षेमध्ये येतो, जिथे जीवोत्पत्तीस पोषक वातावरण आहे. या ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशाच्या वेगाने गेल्यास १२ वर्षं लागू शकतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 20, 2012, 11:19 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
संशोधकांना पृथ्वीच्या नजीक असणाऱ्या ५ नवीन ग्रहांचा शोध लागला आहे. यातला एक ग्रह अशा ताऱ्याचा कक्षेमध्ये येतो, जिथे जीवोत्पत्तीस पोषक वातावरण आहे. या ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशाच्या वेगाने गेल्यास १२ वर्षं लागू शकतात.
द ऑस्ट्रेलियनमध्ये दिलेल्या बातमीनुसार तू सेटी नामक ताऊ सेटी या ताऱ्याच्या गतीचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. यावेळी त्यांना आढळून आलं की, गती आणि दिशेच्या अनियमिततेमुळे इतर आवकाशीय वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण निर्माण होत आहे.
ऑस्ट्रेलिया, चिली, ब्रिटन आणि अमेरिकेतल्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार ताऊ सेटीच्या भोवती फिरणाऱ्या पाच ग्रहांपैकी एका ग्रहाचं द्रव्यमान पृथ्वीच्या पाचपट आहे. या ग्रहाचा आकार पृथ्वीच्या दुप्पट आहे. संशोधकांच्या मतानुसार लहान आणि खडकाळ पृष्ठभाग असणाऱ्या ग्रहावर जीवसृष्टीला पोषक वातावरण असतं.