आयफोन हप्त्यावर, दोन वर्षे मोफत सेवा

जगभरात ख्याती मिळवलेल्या आयफोन आता भारतीयांना सहज घेता येणार आहे. त्यासाठी रिलायन्सने हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन वर्षे मोफत सेवा देण्याचा निर्णयही केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 8, 2013, 04:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगभरात ख्याती मिळवलेल्या आयफोन आता भारतीयांना सहज घेता येणार आहे. त्यासाठी रिलायन्सने हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन वर्षे मोफत सेवा देण्याचा निर्णयही केला आहे.
आयफोन तुम्हाला सुलभ हप्त्याने खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर आयफोनवर हप्ता सुरू असताना दोन वर्षे कसलेही बिल भरण्याची गरज नाही. त्यामुळे दोन वर्षे फोनवर कितीही बोलू शकता. हा फोन वापरताना ३ जी इंटरनेटही अनलिमिटेड वापरता येणार आहे.
आरकॉम अर्थात रिलायन्सने भारतात आयफोन कॉण्ट्रॅक्टवर देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत आयफोन कॉण्ट्रॅक्टवर मिळतो. त्याचप्रमाणे भारतातही आयफोन मिळणार आहे. ही योजना आयफोन ५सी आणि आयफोन ५ एस या दोन मॉडेल्सवरच असल्याचे रिलायन्सने जाहीर केले आहे. हा फोन हप्त्यावर घेताना कोणतेही डाऊन पेमेंटही आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.