तुमचा कॉम्प्युटर होऊ शकतो `अॅण्ड्रॉईड`

Last Updated: Saturday, March 29, 2014 - 11:19

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता तुम्हाला कॉंम्प्युटरवर काम करत असताना मोबाईल वापरायची गरजच नाही. कारण लवकरच तुम्हाला कॉम्प्युटरमध्येही अॅण्ड्रॉईड अॅप वापरता येईल. या अॅपने मोबाईलवरील व्हॉट्स अॅप, गेम्स यासारखे अनेक अॅप्स कॉम्प्युटरमध्ये वापरता येतील.
इंटेलने अशी प्रोसेसर सिस्टीम तयार केली आहे. ज्यामुळे आपण एकाचवेळी विंडोज आणि अॅण्ड्रॉईड वापरु शकतो. मात्र त्यासाठी तुम्हांला वेगळा कॉम्प्युटर घ्यायची गरज नाही. कारण तुम्ही विडोंज कॉम्प्युटरवरही अॅण्ड्रॉईड सहजतेने वापरु शकता.
`ब्लुस्टॅक्स` अॅण्ड्रॉईड सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं की, तुम्ही अॅण्ड्रॉईड इन्स्टॉल करु शकता. तसेच विंडो़ज ऑपरेंटिंग सिस्टमही चालू राहते. पेजमेकर, कोरल ड्रॉ यासारखे प्रोग्राम्सही वापरता येतील.
`ब्लुस्टॅक्स` डाऊनलोड करताना जीमेल किंवा गुगलचे अकाऊंट असणे गरजेचे आहे. ते नसेल तर क्रिएट करावे लागेल. तसेच `ब्लुस्टॅक्स` डाऊनलोड होत असतानाच इन्स्टॉल होईल. तुमचं गुगल अकाऊंट लिंक झालं की `ब्लुस्टॅक्स` डाऊनलोड होईल. डाऊनलोड होऊन इन्स्टॉल झालं की `ब्लुस्टॅक्स` स्टार्टमेन्यूमधील न्यू इंन्स्टॉल प्रोग्राममध्ये दिसेल. त्यानंतर तुम्हांला कॉम्प्युटरमध्ये अॅण्ड्रॉईड वापरता येईल. तसेच `ब्लुस्टॅक्स` शिवाय अॅण्ड्रॉईड इम्युलेट अॅण्ड्रॉयड एक्स-८६, अॅण्ड्रॉईड एसडीके यासारखे अॅप्लिकेशन वापरुन कॉम्प्युटर अॅण्ड्रॉईड करता येईल.
तुम्हांला व्हॉट्स अॅप कॉम्प्युटरमध्ये वापरायचे असेल, तर गुगल प्ले स्टोअरतून डाऊनलोड करावे. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर द्यावां लागेल. जर मोबाईल नसेल तर लॅण्डलाइन नंबरही देऊ शकतो. तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड कॉलने किंवा मॅसेजने येईल. तो कोड टाकला की तुमचे बीबीएम, व्हॉट्सअॅप सुरु होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 29, 2014 - 11:19
comments powered by Disqus