सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर ६ हजारांपर्यंत डिस्काऊंट!

By Jaywant Patil | Last Updated: Monday, July 15, 2013 - 16:45

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सॅमसंग गॅलक्सी स्मार्टफोन सिरीजच्या अनेक फोन्सवर डिस्काऊंट वाढवलं जात आहे. गॅलेक्सी सिरीजच्या ८ फोन्सवर १०५० रुपयांपासून ६३८० रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे.
सॅमसंग गॅलक्सी नोटवर डिस्काऊंट देत आता हा फोन २२,५०० रुपयांमध्ये विक्रीस उपलब्ध झाला आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर गॅलक्सी नोट २६-२७ हजारांना मिळतो. हा फोन २०११मध्ये लाँच करण्यात आला होता. यातील ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड २.३ जिंजरब्रेड आहे. जी आता कालबाह्य मानली जाते. यानंतर सॅमसंग गॅलक्सी नोट २ हा मोबाईल लोकप्रिय झाला. आता सॅमसंग नवा गॅलक्सी नोट ३ लाँच करण्याच्या बेतात आहे.
सॅमसंगने गॅलक्सी चॅटवरील डिस्काऊंट ३१४० रुपयांवरून ५२५० रुपये एवढं केलं आहे. गॅलक्सी एसवर २४०० रुपयांचं डिस्काऊंट जाहीर केलं आहे. १०,००० रुपयांच्या किंमतींमधल्या फोन्सवरही सॅमसंगने चांगलं डिस्काऊंट देत या मोबाईल्स किमत ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या घरात आणली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 15, 2013 - 16:44
comments powered by Disqus