आता फेसबुकवरून हाताळा तुमचे बँकेचे व्यवहार!

नलाईन बँकिंगनंतर आता वेळ आलीय... काही तरी नवीन पाहण्याची, अनुभवण्याची... होय, आता केवळ मोबाईल आणि ऑनलाईन बँकिंग सेवेनंतर तुम्हाला याच सेवा सोशल नेटवर्किंग साईटसवरही मिळणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 26, 2013, 04:27 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
ऑनलाईन बँकिंगनंतर आता वेळ आलीय... काही तरी नवीन पाहण्याची, अनुभवण्याची... होय, आता केवळ मोबाईल आणि ऑनलाईन बँकिंग सेवेनंतर तुम्हाला याच सेवा सोशल नेटवर्किंग साईटसवरही मिळणार आहेत.
‘आयसीआयसीआय’ बँकेनं ‘पॉकेट आयसीआयसीआय बँक’ या नावानं सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर ही सुविधा उपलब्ध करू दिलीय. ही सुविधा मिळवण्यासाठी ग्राहकांजवळ फेसबुक अकाऊंट आणि डेबिट/क्रेडिट कार्ड असणं गरजेचं आहे. या सुविधेमार्फत ग्राहक फंड ट्रान्सफर, मूव्ही तिकिट बुकिंग, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, चेक बुक ऑर्डर, चेक पेमेंट प्री-पेड मोबाईल फोनचं रिचार्जही करू शकतील. ग्राहकांना दररोज जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येतील.
ही सुविधा पूर्ण स्वरुपात सुरक्षित असेल असा दावा बँकेनं केलाय. त्यामुळेच ग्राहकांनो आता फेसबुकवर चॅटींग आणि स्टेटस अपडेट करण्याव्यतिरिक्त बँकिंग सेवाही वापरण्याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.

सुविधा सुरु करण्यासाठी
> तुमचं फेसबुक अकाऊंट नसेल तर अगोदर फेसबुक अकाऊंट सुरू करा.
> त्यानंतर फेसबुक बँक अकाऊंटला जोडण्यासाठी डेबिट कार्ड नंबर आणि पिनची माहिती दिल्यानंतर हे अकाऊंट एकमेकांना जोडले जातील.
> ग्राहकांचे व्यवहार सुरळीत आणि सुरक्षित राहावेत यासाठी प्रत्येक वेळेस एक नवा ‘वन टाईम पासवर्ड’ (OTP) तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल.
> हा नंबर टाकल्यानंतरच तुमचा व्यवहार पूर्ण होईल.
> बँकेच्या दाव्यानुसार, सर्व माहिती आणि व्यवहार १२८ bit मध्येच इन्स्क्रिप्टेड होईल. तसंच https प्रोटोकॉलवरच सर्व व्यवहार होऊ शकतील. यामुळे गैरव्यवहार आणि खोट्या वेबसीटपासून ग्राहकांना सुरक्षित ठेवता येऊ शकेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.