‘जो तेरा है वो मेरा है’ म्हणत भारतीय आघाडीवर!

भारतीयांना सोशल वेबसाईटचं जणू वेडच लागलंय... होय, हे आम्ही नाही तर आकडेवारी सांगतेय. फेसबूक आणि ट्विटरवरील शेअरिंगमध्ये भारत अग्रेसर असल्याचं ही आकडेवारी सांगते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 4, 2013, 03:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीयांना सोशल वेबसाईटचं जणू वेडच लागलंय... होय, हे आम्ही नाही तर आकडेवारी सांगतेय. फेसबूक आणि ट्विटरवरील शेअरिंगमध्ये भारत अग्रेसर असल्याचं ही आकडेवारी सांगते.
‘जो तेरा है वो मेरा है’ म्हणत सोशल वेबसाईटचे चाहते तरुण-तरुणी एकमेकांचे कोटस्, स्टेटस अपडेट्स, व्यक्त होणाऱ्या भावना, फोटो, व्हिडिओ किंवा लिंक्स शेअर करताना दिसतात. हे प्रमाण भारतीयांमध्ये सर्वात जास्त आहे. या प्रमाणाणं इतर देशांनाही मागे टाकलंय. ‘इंटरनेट आणि कंप्युटिंग ट्रेण्ड’ या अमेरिकी कंपनीने याबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार खासगी जीवनातील ‘सर्वकाही’ ऑनलाइन शेअर करणाऱ्या युझर्सच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर याच यादीत सौदी अरेबियाने पहिला क्रमांक पटकावला आहे.
केलिनर परकिन्स कॉफिल्ड अँण्ड बायर्स (केपीसीबी) या फर्मने केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर, इंटरनेट युझर्सची वाढती संख्या, टॅबलेट कंप्युटिंगचा वापर आदींचा अभ्यास करून ‘मिकर रिपोर्ट’ नावाचा अहवाल सादर करण्यात आला आहे
मागील वर्षात स्मार्टफोन वापरणार्यां च्या संख्येचा विचार करता जगभरातील देशामध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागत होता. त्या तुलनेत यंदा स्मार्टफोन वापरणार्यांमची संख्या ५२ टक्क्यांनी वाढली आहे. २००८ ते २०१२ या चार वर्षात भारतामध्ये ८८ लाख स्मार्टफोनची विक्री झाली असून मागील वर्षात इंटरनेट वापरणार्यां ची संख्याही १३७ लाखावर जाऊन पोहोचली आहे. स्मार्टफोन वापरात चीन खालोखाल भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीनमधील स्मार्टफोनधारकांची संख्या २६४ लाख तर इंटरनेटधारकांची संख्या ५६४ लाख इतकी मोठी आहे.

दिवसभरात स्मार्टफोन युझर्स कितीवेळा आणि कोणत्या कारणासाठी आपला मोबाइल वापरतात याचीही पाहणी करण्यात आली. त्या पाहणीनुसार, सर्वसामान्य स्मार्टफोन युझर दिवसभरात १५० वेळा आपला फोन चेक करतो. त्यापैकी १८ वेळा तो वेळ पाहण्यासाठी तर, २३ वेळा मेसेज अपडेट पाहण्यासाठी मोबाइल हातात घेतो, असे अहवालात म्हटलं गेलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.