इंटरनेटशिवाय आता फेसबुक

तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर काही काळजी करू नका. आता सोशलनेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणारे फेसबुक इंटरनेटशिवाय सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाची जी गरज होती ती आता पूर्ण होवू शकेल. फेसबुकने अब्जावधी लोकांचा विचार करून एक नवे मेसेंजर अॅप लाँच केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 6, 2012, 01:04 PM IST

www.24taas.com,मुंबई
तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर काही काळजी करू नका. आता सोशलनेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणारे फेसबुक इंटरनेटशिवाय सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाची जी गरज होती ती आता पूर्ण होवू शकेल. फेसबुकने अब्जावधी लोकांचा विचार करून एक नवे मेसेंजर अॅप लाँच केले आहे.
आजच्या युगात प्रत्येकाच फेसबुकवर अकाऊंट असणे ही गरज झाली आहे. `फेसबुक` वर अकाऊंट ओपन करण्याची इच्छा असली, तरी इंटरनेट अॅक्सेस नसल्याने फेसबुकला मुकावे लागत होते. काहीजण ऑफिस तसेच कामाच्या ठिकाणी चोरून फेसबुक ओपन करतात. अशावेळी नोकरी जाण्याचा धोका असतो. आता हा धोका दूर झालाय. कारण फेसबुकने युजरची संख्या वाढविण्यासाठी नवा फंडा शोधला आहे, तो म्हणजे इंटरनेशिवाय फेसबुक.
फेसबुकने जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यात भारत, इंडोनेशिया, व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. फेसबुक वारणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन फेसबुकने एक नवे मेसेंजर अॅप लाँच केले आहे. ज्यांचे `फेसबुक` वर अकाऊंट नाही, त्यांच्यासाठी फेसबुकच अॅप असेल. यात केवळ एक अट आहे, ती म्हणजे अॅन्ड्रॉइड फोनची. ज्यांच्याकडे अॅन्ड्रॉइड फोन असेल, त्यांनाच ई - मेल आणि इंटरनेटशिवाय फेसबुकवर हाताळता येणार आहे.
अॅपलचा आय फोन आणि स्मार्ट फोनवर ही सुविधा देण्याचे फेसबुक प्रयत्नशील आहे. हे अॅप्लिकेशन लवकरच जगभरात सुरू केले जाणार आहे. नेहमीप्रमाणेच टेक्स्ट मेसेज करण्याच्या सुविधेबरोबर एका सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनच्या आधारे टेक्स्ट कम्युनिकेशन आणि विशेष म्हणजे व्हिडिओ कम्युनिकेशनही करता येणार आहे.
या सुविधेमुळे फेसबुकच्या यूजरच्या संख्येत कोट्यवधींची भर पडण्याची शक्यता आहे. नव्या मेसेंजर अॅपमुळे आणखी कोट्यवधी युजर्सचा फेसबुक युजचा मार्ग मोकळा झाला आहे.