<b>आयफोन 4S झाला भारतात स्वस्त! </b>

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, October 16, 2013 - 13:24

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अॅपलने भारतात आयफोन 4S च्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे. ही किमत भारतात आयफोन 5S आणि आयफोन 5C लॉन्च होण्यापूर्वी २ आठवडे अगोदरच या किंमती कमी करण्यात आल्या आहे. नवा आयफोन भारतात १ नोव्हेंबरला दाखल होणार आहे.
आयफोन 4Sची किंमत आता ३१ हजार ५०० रुपये करण्यात आली हे. यापूर्वी याची ऑफिशिअल किंमत ३८ हजार ५०० रुपये होती म्हणजे साधारण ७००० रुपयांना किंमत कमी करण्यात आली आहे.
भारतात 5S १६ जीबी ५३ हजार ५०० रुपयांना, ३२ जीबी ६२,५०० रुपयांना आणि ६४ जीबी ७१ हजार ५०० रुपयांना विकण्यात येणार आहे. हे गोल्ड, सिल्वर (व्हाइट) आणि ग्रे (ब्लॅक) कलरमध्ये विकण्यात येणार आहे.
आयफोन 5C हा फोन १६ जीबी ४१ हजार ९०० आणि ३२ जीबी ५३ हजार ५०० रुपयांना मिळणार आहे. हा फोन निळा, हिरवा, गुलाबी, पिवळा आणि पांढऱ्या रंगात मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013 - 13:24
comments powered by Disqus