आता एटीएममधून मिळणार 50 रुपयांच्या नोटा

एटीएम मशिनमधून आता जबरदस्तीने 500 रुपयांच्या नोटा घ्याव्या लागणार नाही. कारण आता 100 रुपयांबरोबरच 50 रुपयांच्या नोटा मिळणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशांची चणचण भासणार नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 21, 2014, 04:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रांची
एटीएम मशिनमधून आता जबरदस्तीने 500 रुपयांच्या नोटा घ्याव्या लागणार नाही. कारण आता 100 रुपयांबरोबरच 50 रुपयांच्या नोटा मिळणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशांची चणचण भासणार नाही.
1000, 500 आणि 100 रुपयांच्या नोटा मिळत असतात. आता यामध्ये 50 रुपयांच्या नोटांची भर पडणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने तसे बॅंकाना निर्देश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी होत आहे.
छत्तीसगडमध्ये एटीएममधून 50 रुपये मिळणास सुरुवात झाली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांची गरज लक्षात घेऊन तशी सेवा देण्याचे निर्देश बॅंकाना दिले होते. त्याची अंमलबजावणी होत असल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.