टाटाचं ‘फोटोन मॅक्स वाय-फाय’ लॉन्च

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, December 2, 2013 - 08:53

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
टाटा फोटॉन आपल्या ‘वाय-फाय’ सुविधांसाठी चांगलंच परिचित आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता टाटानं खिशाला परवडतील असे ‘फोटोन मॅक्स वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून दिलीय.
‘वाय-फाय’ कनेक्ट करणारी अनेक मोबाईल हॅन्डसेट, लॅपटॉप आणि अशाच प्रकारची अनेक उपकरणं सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्ही कधीही तुमच्या हातातील उपकरणांवर कोणत्याही वायरशिवाय इंटरनेट वापरू शकता. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त डिव्हासेस असतील आणि या सर्वांवर तुम्हाला इंटरनेट हवंय... तेही प्रवासादरम्यानही, तर प्रत्येक डिव्हाईसवर वेगवेगळे इंटरनेट प्लान्स घेणं थोडं खर्चिक पडू शकतं... आणि हे वापराच्या मानाने प्रॅक्टीकलही नाही. अशाच ग्राहकांसाठी टाटानं ‘फोटोन मॅक्स वाय-फाय’ सुविधा सादर केलीय.

‘यूएसबी’च्या साहाय्यानं तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही डिव्हाईसला हे वाय-फाय कनेक्ट करू शकता. याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकाच वेळी पाच डिव्हाईसेस या ‘यूएसबी हब’ जोडू शकता... आणि सगळ्याच डिव्हाईसवर एकाच वेळी इंटरनेट वापरू शकता.
कंपनीच्या दाव्यानुसार, फोटॉन मॅक्स वाय-फायचा स्पीड जवळजवळ ६.२ Mbps पर्यंत आहे. टाटाच्या यूएसबी डिव्हाईची किंमत आहे, १९९९ रुपये आणि यासाठीचे प्लान्स सुरु होतात... तीन जीबीसाठी ६५० रुपये प्रति महिना... जास्तीत जास्त किंमतीचा प्लान म्हणजे, १५ जीबीसाठी १५०० रुपये प्रति महिना....
ही सुविधा तुम्ही भारतात कोठेही वापरू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला रोमिंग चार्जेसही द्यावे लागणार नाहीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 2, 2013 - 08:53
comments powered by Disqus