नकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर! man uploads girl`s pics on porn site to defame her

नकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर!

नकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून त्या मुलीला बदनाम करण्यासाठी तिचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला ३२ वर्षीय अमोल कारखानीस हा तरुण उच्चशिक्षित असून तो मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर काम करत होता.

मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजरच्या पदावर काम करणाऱ्या अमोलचं त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यने मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र त्या मुलीने लग्नाला नकार दिला. या गोष्टीमुळे संतापून अमोलने मुलीला बदनाम करण्याची योजना आखली. पुण्यातील ओंकार प्रधान नामक एका ऑनलाईन मित्राच्या मदतीने अमोलने मुलीचे अनेक फोटो मिळवून ते पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले. तसंच अश्लील चॅटिंगसाठीही या फोटोंचा वापर केला.

या प्रकरणी मुलीने पोलिसांकडे तक्रार केल्यावर मुंबईच्या सायबर क्राईम सेलने अमोल आणि ओंकार या दोघांनाही अटक केली आहे. या दोघांनाही १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 11, 2013, 08:48


comments powered by Disqus